गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यात गणेशोस्तवाची (Pune ganeshotsav 2023) जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. अशात पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएमलने गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठी गुड न्यूज दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान पीएमपीएमएलच्या बसेस रात्रभर सुरू राहणार असल्याची माहिती आहे.

गणपतीचं डेकोरेशन पाहण्यासाठी अनेक पुणेकर बाहेर पडतात. यामुळे पीएमपीएमएल रात्रभर सुविधा देणार आहे. तसेच जादा बसेस देखील सोडण्यात येणार आहेत. एकूण 270 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान शहरात जादा बसेस धावणार आहेत. यामुळे भाविकांची सुविधा होणार आहे. पुणे शहरात गणेशोस्तवासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालं आहे.

गणपतीमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने देखील महत्त्वाचा निर्णय घेतलााय. गणेशोत्सव काळात पुण्यात होणाऱ्या गर्दीवर आता पुणे मेट्रोने उपाय शोधला आहे. आता पुणे मेट्रोने मेट्रोकडून गणपती मेट्रोतून घरी नेण्याची नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मेट्रोच्या निर्णयामुळे गणेश चतुर्थीला (Ganesh chaturthi 2023) पुणेकरांची वाहतूक कोंंडीतून सुटका होणार आहे आणि प्रवासही सुलभ होणार आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाने ट्विट करुन नियमावली जाहीर केली आहे.

नागरिकांसाठी योग्य नियमावली मेट्रोकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यात काय करावं आणि काय करुन नये, या गोष्टी सांगण्यात आल्या आहे. सर्व नियम पाळून या सुविधेचा लाभ घ्या, असंदेखील आवाहन मेट्रोकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-