रोटरीची मिलेट जत्रा उत्साहात संपन्न, ‘भरड धान्य’ मुख्य आकर्षण!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | संयुक्त राष्ट्र संघटना यांनी घोषित केलेले आंतरराष्ट्रीय भरडधान्य (मिलेट) वर्ष २०२३ रोटरी क्लब पुणे कॅम्प यांनी १५ इतर रोटरी क्लब, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, नाबार्ड व मिलेट अड्डाला सोबत घेवून १० सप्टेंबर ला सकाळी ०८०० पासून रात्री ०९०० वाजेपर्यंत अल्प बचत भवन, पुणे कॅम्प येथे भरवलेली रोटरी मिलेट जत्रा ३५ हून अधिक प्रॉडक्ट स्टॉल व १० हून अधिक भरडधान्यापासून बनविलेल्या पदार्थांचे स्टॉल सगळयांचे लक्ष वेधून घेत होते. ३००० हून अधिक लोकांनी केलेल्या विज़िट व १० लाख पेक्षा अधिक एका दिवसात सर्व स्टॉल मिळून झालेला टर्नओव्हर नक्कीच सर्वांना चेतना देणारा होता. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे एका शेतकरी उद्योजक महिलेच्या हस्ते रिबन कापून झालेले उद्घाटन खरं तर ह्या कार्यक्रमाला नवीन आयाम देणारे होते.

1

गेले १५ वर्ष भरडधान्याचे संवर्धन महाराष्ट्राच्या दुर्गम भागात करणाऱ्या शेतकर्यांना दिमाखात स्टेज वरती बसण्याची संधी देण्याचे व त्यांचा सन्मान करण्याचे सौभाग्य आम्हा लाभले. यामध्ये कळसूबाई मिलेट च्या नीलिमा जोहर, मेळघाट मिलेटच्या प्रियांका इंगळे, सोलापूरच्या ज्वारी भाकरी साठी प्रसिद्ध असलेल्या वनिता तंबाके, नंदुरबारचे मनोहर पाडवी, मराठवाडा ग्रामउर्जा फाऊंडेशन च्या चंद्रकला गायकवाड आणि नंदुरबार च्या गिरासे. अशा या काळ्या मातीतल्या नायकांना गौरवण्याची संधी रोटरी मिलेट जत्रेच्या माध्यमातून मिळाली.

2

आदिवासी बहुल नृत्य, अनेक ऊप-पदार्थांची रेलचेल, मिलेट परिसंवाद, चर्चासत्रे, मिलेट खरेदीदार आणि विक्रेता संमेलन, मिलेट पाककला स्पर्धा या सर्वांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाला माजी प्रांतपाल पंकज शहा, प्रांतपाल मंजू फडके आणि पुढील वर्षाचे प्रांतपाल शितल शहा यांनी भेट दिली तर सन्माननिय उपस्थिती कृषी संचालक विकास पाटिल, आत्माचे राज्य संचालक तांभाळे, संयुक्त कृषी संचालक रफिक नाकवडी, जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे आणि भरड धान्य तज्ञ सदाफुले यांची लाभली सैन्यांत असताना अवकाली आलेले अपंगत्व आणि क्वीन्स मेरी टेक्निकल इंस्टिट्यूट, खडकी या सर्वांना स्वतःच्या पायावरती उभे राहण्याचे देत असलेले प्रशिक्षण नक्कीच कौतुकास्पद असे जवळ जवळ ४० जवान सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. अशा ह्या एकमेवाद्वितीय कार्यक्रमाला कृषी विभागातील आणि रोटरी परिवारातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.

3

रोटरी मिलेट जत्रे पासून झालेली सुरुवात “रोटरी मिलेट कट्ट्या” मध्ये परावर्तीत होत आहे.. रोटरी मिलेट कट्टा ही सर्व खरेदीदार, विक्रेते भरड धान्य पिकविणारे शेतकरी, कृषी तज्ञ आणि मिलेट व्यवसायातील तज्ञ ह्या सर्वांना जोडणारा मजबूत धागा आहे.

शहर-ग्रामीण-आदिवासी ह्या सर्वांना एक साथ जोडण्यात भरडधान्य नक्कीच महत्त्वपुर्ण भूमिका आगामी काळात बजावेल.. विशेष म्हणजे सदर उपक्रमाची दखल रोटरी इंटरनॅशनल चे डायरेक्टर रो,अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी देखील घेतली.. सदर चळवळ रोटरी ची उपस्थिती असलेल्या २२० देशांत पोहचविण्याचे काम आता “रोटरी मिलेट कट्ट्याच्या” माध्यमातुन होईल यात शंका नाही. अनेक उपघटकाना एकत्र आणण्याचे काम तसे आव्हानात्मक होते परंतु सर्वांच्या एकजुटीने ही सांगड अतिशय व्यवस्थित घालता अली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब पुणे कॅम्प चे अध्यक्ष रो. प्रदिप खेडकर तर सूत्र संचलन प्राध्यापक दिगंबर ढोकले व रो. क्रांती शहा यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या-