आयुष्यात इतकं टेन्शन फ्री असायला हवं; चालत्या ट्रकखाली झोपले काका, पाहा व्हिडीओ

मुंबई | जेव्हा एखादी व्यक्ती अशा परिस्थितीत अडकलेली असते की ती काहीही करू शकत नाही, तेव्हा जुगाड कामी येतो. कारण अशा परिस्थितीत, बहुतेक लोक त्यांच्या मनात येईल ते करतात. याचं एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. काही लोकांचं टॅलेंट पाहून सगळेच थक्क होतात. कधी कोणी 7 सीटर बाईक बनवतो, तर कधी कोणी असा शोध लावतो की इंजिनीअरही फसतात. मात्र सध्या एका नव्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका काकांनी झोपण्यासाठी चक्क ट्रकखाली एक अलिशान बेड बनवला आहे.

ही क्लिप इंस्टाग्रामवर (indian_ka_talent) नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- भारतात कोणत्या प्रकारचे लोक राहतात. 6 दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओला बातमी करेपर्यंत 62 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रस्त्यावरून एक ट्रक भरधाव धावत असल्याचं दिसून येतं. पण व्हिडीओच्या दुसऱ्या भागात दिसणारे दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडीओत ट्रकखाली एक काका शांतपणे झोपलेले दिसतात.

काकांनी आपल्या झोपण्याची अशी व्यवस्था केली आहे की कोणी विचारही करू शकत नाही. हा जुगाडू बेड दिसायला खूपच अप्रतिम आहे. पण त्यावर झोपणं हे खूप धोकादायक आहे. कारण छोटीशी चूकही जीव घेऊ शकते.

काकांचा जुगाड मजबूत आहे. कमेंट करताना एका इंस्टाग्राम युजरने लिहिलंय की आयुष्यात इतकं टेन्शन फ्री असणं आवश्यक आहे. दुसरा म्हणाला- आयुष्य सगळ्यांचं सारखं नसतं. त्याचवेळी आणखी एक युजर म्हणाला- आयुष्यात एवढी रिस्क कोण घेतं, ही काय मजबुरी आहे भाऊ?. यावर अशा अनेक प्रतिक्रिया आल्यात.

https://www.instagram.com/p/Cw4Iy7npI_r/?utm_source=ig_web_copy_link

महत्त्वाच्या बातम्या-