वर्षभरापूर्वी लग्न, 2 महिन्यांची मुलगी… हुमायून यांचं डोळ्यात पाणी आणणारं हौतात्म्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

श्रीनगर | जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) शहीद डीएसपी हुमायून भट (Humayun Bhatt) यांना दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये दहशतवाद्यांशी लढताना अश्रूंच्या डोळ्यांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. हुमायून भट यांच्यावर बडगाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी डीएसपी हुमायून यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यादरम्यान माजी आयजीपी गुलाम हसन भट यांनीही त्यांचे शहीद पुत्र डीएसपी हुमायून भट यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हुमायून भट्ट यांना दोन महिन्यांची मुलगी आहे. भट्ट यांचे वडील गुलाम हसन भट्ट हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक आहेत. दोन वर्षांपूर्वीच हुमायून यांचं लग्न झालं होतं.

गुलाम हसन भट यांचं एक वडील म्हणून मन दुखलं असेल पण पोलीस अधिकारी म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहताना ते अगदी शांत दिसले. एका वडिलांनी आपल्या मुलाच्या पार्थिवावर पुष्पांजली वाहताना बघताना सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. हे दृष्य काळीज पिळवटून टाकणारं आहे.

दरम्यान, अनंतनागमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत लष्कराच्या कर्नलसह तीन सुरक्षा दलाचे अधिकारी शहीद झाले. या गोळीबारात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट गंभीर जखमी झाले, त्यानंतर तिघेही शहीद झाले.

महत्त्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe