अयोध्यातील राम मंदिराच्या खोदकामात आढळल्या चकीत करणाऱ्या वस्तू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अयोध्या | अयोध्येतील श्रीराम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) बांधकाम सुरु आहे. या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार असून याची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. मंदिरासाठी सुरु असलेल्या खोदकामात अनेक प्राचीन मूर्ती आणि स्तंभ आढळले आहेत.

या बाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय (Champat Rai) यांनी काही प्राचीन मंदिराचे अवशेष आणि मूर्तीचे फोटो आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन शेअर करत या बद्दलची माहिती दिली आहे. शेअर केलेल्या फोटोजमध्ये अनेक मूर्ती व स्तंभ दिसत आहेत. शिवाय या ठिकाणी काही पाषण आहेत ज्यावर मंदिराचं कोरीवकाम केलेलं दिसत आहे.

काही दगडी शिल्पेही पाहायला मिळत आहे. या बराेबरच दगडी कोरीव शिल्पे, खांब, दगड आणि देवी-देवतांच्या कलाकृतींचा समावेश आहे. दरम्यान हे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले हे सांगण्यात आले नाही, मात्र मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भाविकांना दर्शन घेता येईल.

मिळालेल्या माहितीनूसार श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे चंपत राय यांनी सांगितलं की, याआधी सुद्धा राम मंदिरासाठी केलेल्या उत्खननात अशा प्रकारचे शिल्प, मूूर्ती आढळून आल्या होत्या. त्यासाठी आता राम मंदिर परिसरामध्ये एक संग्रहालय बांधण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

iphone 15 बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीये का?

विमानात नको त्या अवस्थेत सापडलं जोडपं, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘मला त्यांनी नग्न केलं होतं’; मृणाल दिवेकरचा धक्कादायक खुलासा

“कोथळा बाहेर काढा…” नाना पाटेकरांचा मुनगंटीवारांना सल्ला, बघा कुणाचा?

काळजी घ्या, हवामान विभागाकडून ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट