काळजी घ्या, हवामान विभागाकडून ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने (Rain) हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच मुसळधार कोसळतोय. हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांच्या नागरिकांना पुढच्या तीन ते चार तासांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचं पुनरागमन झालंय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पोहोचला नसला तरी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे (Rain) या सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या सहा जिल्ह्यांसाठी पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे या सहा जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन झालंय. अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आलेले होते. अखेर शेतकऱ्यांना आज पडलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-