उद्याचा दिवस… जरांगे पाटलांनी घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. त्यांच्या याच उपोषणास्थळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेनंतर राज्यभरात मराठा समाजात संताप पाहायला मिळाला. सध्या अंतरवाली सराटी गाव मराठा आरक्षणाच्या मागणीचं केंद्रबिंदू बनला आहे. नोज जरांगे यांनी उपोषण सोडावं, अशा विनंतीचं पत्रही सरकारने दिले आहे. पण जरांगे-पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.आता जरांगे-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

उद्या माझ्या अल्टीमेटमनुसार शेवटचा दिवस आहे. उद्यापर्यंत  निरोप न आल्यास सलाईन काढणार, पाणी बंद करणार, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिलाय. उद्या दिवसभर पर्यंत मी सरकारची वाट पाहील. सरकारसाठीच मी सलाईन घेतलं. उद्या शेवटचा दिवस आहे.  यानंतर हे सर्व बंद करणार आहे. सलाईन काढणार आणि पाणी देखील सोडणार आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, असं ते म्हणालेत.

सरकारसाठी आम्ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता मात्र अजून सरकारचा निरोप नाही. आज  आम्ही सरकारच्या निरोपाची वाट पाहत आहे. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव जाहीर करणार नाही. तज्ञ, वकील, शेतकरी असे 20 आणि 21 लोक शिष्टमंडळात असतील. आमच्याकडून देखील चर्चेची दार खुली आहे, असं त्यांनी सांगितलं.

मराठा समाजातल्या ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहेत, त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पण सर्व सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. तसेच सरसगट प्रमाणपत्र देण्यासाठी एक महिन्याची वेळ सरकारने मागितली आहे. तर, आमच्याकडे कुणाकडेच कुणबी असल्याची नोंदी नाहीत. त्यामुळे कालच्या निर्णयाचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे यात सुधारणा केली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

वंशावळी शब्दाला जरांगे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं, अशा विनंतीचं पत्र सरकारकडून देऊनही त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. 

महत्त्वाच्या बातम्या-