मोठी बातमी! दहीहंडीमुळे पुण्यातील ‘हे’ रस्ते राहणार बंद

पुणे | पुणेकरांसाठी (Pune) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहिहंडी (Dahihandi) पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

दरवर्षी पुण्यातील मध्यभागी असलेल्या मुख्य रस्त्यांवर दहीहंडी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यामुळे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच पीएमपी बसेसच्या मार्गात देखील बदल करण्यात आला आहे.

बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक होणार आहे. मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई अशा रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग वापरावा.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटला जाणार्‍या वाहनांना स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्यानं खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जाता येईल. रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील.

गणेश रस्त्यावरील वाहतूक दारुवाला पूल येथून बंद राहील. देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकीज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दूधभट्टी या मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या-