मराठा आंदोलक आक्रमक, राज ठाकरेंचा ताफा तीनवेळा अडवला, वाचा नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | जालन्यातील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. पोलिसांचा लाठीहल्ला आणि गोळीबार यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा संघटना प्रचंड संतापल्या. त्याचे पडसाद राज्यभरात ठिकाठिकाणी पाहायला मिळत आहेत. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. आरक्षणप्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सरकारवर टीकास्त्र सोडलंय. तसेच राज ठाकरे आज जालन्यात आंदोलकांची भेट घेणार आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) हे सकाळीच जालन्याकडे जायला निघाले. औरंगाबादला आल्यानंतर ते कारने जालन्याकडे जायला निघाले होते. यावेळी राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजताच या आंदोलकांना राज ठाकरे यांचा ताफा अडवला.

राज ठाकरे यांनीही कारच्या खाली उतरून मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे यांना निवेदनही दिलं. यावेळी आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. राज ठाकरे यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पुन्हा त्यांचा ताफा राजापूरकडे रवाना झाला.

राज ठाकरे अंबडमध्ये रुग्णालयात जाऊन जखमी मराठा आंदोलकांची विचारपूस करणार आहेत. दरम्यान राज ठाकरे या ठिकाणी येत असल्याने या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितले आहे. कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे. जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-