Inova HyCross OS | गडकरींनी लाँच केली अनोखी गाडी, मका-ऊसापासून बनणाऱ्या इंधनावर चालणार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | पेट्रोल-डिझेल-सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांनंतर आता इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 100 टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारचे लाँचिंग केलं आहे. टोयोटो इनोव्हा हायक्रॉस (Inova HyCross OS) असं या कारचं नावं आहे.

टोयोटा मोटरने जगातील पहिली कार सादर केली आहे जी पूर्णपणे इथेनॉलवर चालू शकते आणि फ्लेक्स-इंधन इंजिनने सुसज्ज आहे. कार निर्मात्याच्या लोकप्रिय MPV इनोव्हा हायक्रॉसवर आधारित मॉडेल लाँच करण्यात आलं आहे.

काय खास आहे कारमध्ये

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स-इंधन एमपीव्ही पूर्णपणे इथेनॉलवर चालेल. इथेनॉलला E100 ग्रेड दिलेला आहे, जे सूचित करते की कार पूर्णपणे पर्यायी इंधनावर चालते. MPV मध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅक देखील असेल, जो कारला ईव्ही मोडवर चालवण्यास मदत करण्यासाठी पुरेशी उर्जा निर्माण करण्यास सक्षम असेल.

Inova HyCross OS चे फ्लेक्स-इंधन प्रकार सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या MPV च्या हायब्रिड आवृत्तीपेक्षा थोडं वेगळं आहे. इंजिन E100 ग्रेड इथेनॉलवर चालण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. हे स्व-चार्जिंग लिथियम-आयन बॅटरी देखील वापरते, जी एमपीव्ही फक्त ईव्ही मोडवर चालवण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड 2.0-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह संचलित आहे. जे 181 bhp जनरेट करते आणि 23.24 kmpl ची इंधन अर्थव्यवस्था देते. हे इंजिन ई-सीव्हीटी ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे.

फ्लेक्स-इंधन म्हणजे काय?

फ्लेक्स-इंधन हे एक विशेष प्रकारचं तंत्रज्ञान आहे, जे वाहनांना 20 टक्क्यांहून अधिक इथेनॉल वापरण्याची परवानगी देते. फ्लेक्स इंधन हे गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणापासून बनवलेले पर्यायी इंधन आहे. फ्लेक्स-इंधन वाहन इंजिन एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर चालण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

हे इंधन कसं तयार केले जातं?

फ्लेक्स इंधनाला अल्कोहोल बेस इंधन देखील म्हणतात कारण हे ऊस, मका यांसारख्या उत्पादनांपासून बनवलं जातं. ते तयार करण्यासाठी स्टार्च आणि साखरेचा किण्वन होतो. भारतात उसाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे असं इंधन मोठ्या प्रमाणावर बनवण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-