दीर्घकाळ सेक्स न केल्यानं काय होतं?, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

कोणी सेक्सवर उघडपणे बोलत नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात सेक्स ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सेक्स केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मूड चांगला ठेवण्यासोबतच ते हृदयाच्या आरोग्याला चालना देऊ शकते. त्याचबरोबर तणावाची लक्षणे दूर करू शकतात. जर सेक्स केल्याने हे सर्व फायदे मिळत असतील तर सेक्स न केल्याने काही परिणाम होतात का? होतात तर ते कोणते? हे आपण जाणून घेऊयात. नुकतंच यासंदर्भात एका संशोधन करण्यात आलंय. यातून धक्कादायक माहिती समोर आलीये. सेक्स न केल्याने शरिरावर कोणते परिणाम होतात हे आपण जाणून घेऊयात.

तणाव वाढतो

जेव्हा तुम्ही सेक्समध्ये आनंद अनुभवता तेव्हा शरीर तुम्हाला झोपायला मदत करणारे हार्मोन्स सोडते. हे हार्मोन्स शरीरातील ताणतणाव कमी करतात आणि तुम्हाला लवकर झोपायला मदत करतात. पण जर तुमचा बराच काळ संबंध नसेल तर तुमची चिडचिड होऊ शकते आणि तुम्हाला तणावही येऊ शकतो.

त्वचेवर पडतो गंभीर परिणाम

तुम्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येण्याची शक्यता असल्याचं, एक संशोधनातून समोर आलं आहे. मात्र याऊलट सतत शारीरिक संबंध ठेवल्यास तुमची त्वचाही चमकदार होऊ शकते. सेक्स केल्यानंतर शरीरात डोपामाइन हार्मोन वाढतो आणि त्यामुळे आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते.

रोगप्रतिकारशक्तीवरही होतो परिणाम

जर तुम्ही शारीरिक संबंध दीर्घकाळ ठेवले नाही तर त्याचा तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. जर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. दीर्घकाळ सेक्स न केल्यास शरीरात वेदना होऊ शकतात. पीरियड क्रॅम्प्स, स्नायू दुखणे किंवा डोकेदुखी यांसारख्या वेदनांवर सेक्स हा एक प्रभावी उपाय असू शकतो.

मेंदूवरही होतो परिणाम

संशोधनानुसार जे लोक वारंवार सेक्स करतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. कारण सेक्स तुमच्या मेंदूला न्यूरॉन्स विकसित करण्यास आणि सर्वसाधारणपणे चांगले कार्य करण्यास मदत करते. अशा परिस्थितीत दीर्घकाळ संबंध न ठेवल्याने मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

नातं बिघडू शकतं

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दीर्घकाळ संबंध ठेवत नाही, तेव्हा तुमचं नातं बिघडू शकतं. नियमित सेक्स तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावनिकदृष्ट्या जवळ येण्यास मदत करतो. ज्यामुळे परस्परसंवाद सुधारतो. आठवड्यातून एकदा कनेक्शन करा.

महत्त्वाच्या बातम्या-