“झाकणझुल्या… कधी तो शेवटचा अग्रलेख लिहायचा दिवस येईल कळणार नाही”

मुंबई | ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. फडणवीस, सांभाळा, या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीकास्त्र सोडलंय.

लवकरच माजी खासदार होणारे स्वतःच्या कायम स्वरुपी माजी मुख्यमंत्री राहणाऱ्या तुमच्या मालकाला पहिले सांभाळा असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे. कधी तो शेवटचा अग्रलेख लिहायचा दिवस येईल हे कळणार ही नाही. मग अंधारात बसून जेलच्या भिंतीवर माजी माजी माजी लिहीत रडत बसायला लागेल झाकणझुल्या, अशी टीका नितेश राणेंनी केलीये.

देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण उप झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. मुख्यचा उप झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे, अशी टीका संजय राऊतांनी अग्रलेखातून केलीये.

झोपलेल्यांना जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन पडलेल्यांना जागं कसं करायचं, हा प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत. एक आपले मुख्यमंत्री ते सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत, असं राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-