मोदी सरकारला हादरवून सोडणारी बातमी!

नवी दिल्ली | मोदी सरकारला (Modi Goverment) हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने (Cag Report) ओढले आहेत.

दिल्लीतल्या द्वारका एक्सप्रेस वे च्या कामात प्रतिकिलोमीटरसाठी 18 कोटी रुपयांची मंजुरी असताना 250 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा कॅगचा अहवालात करण्यात आला आहे.

रस्ते विकासासाठी केंद्राच्या भारतमाला परियोजनेत 15 कोटी रुपये प्रति किमी ऐवजी 32 कोटी रुपये प्रति किमी खर्च केला गेला, टेंडरची प्रक्रियाही नियमानं पार पडली नसल्याचा दावा कॅगने केला आहे. कॅगच्या अहवालाचा आधार घेत काँग्रेसनं मोदींवर सर्वात मोठा हल्लाबोल केलाय.

मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडून टाकल्याची टीका आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी (Narendra Modi) भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढत असल्याचा आव आणतात, मग आता या गैरव्यवहारांवर काही बोलणार का?, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-