जयंत पाटलांना भाजपची ऑफर; शरद पवारांचा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे भाऊ ईडीच्या रडारवर आले आहेत. जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंग पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. यामुळे जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शनिवारी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात गुप्त भेट झाली होती. या भेटीनंतर ही भगतसिंग पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. मात्र बैठकीचा या कारवाईशी काही संबंध नाही अशी प्रतिक्रीया जयंत पाटील यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांची देखील ईडी चौकशी झाली होती. यामुळे आता दोघे भाऊ ईडीच्या रडारवर आले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे.

ईडीची भिती घालून सहकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. तसेच जयंत पाटील यांना भाजपची ऑफर असल्याचा खुलासा पवारांनी केलाय.

जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस आल्याचं मला समजलं. सत्तेचा गैरवापर करुन काही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनाही अशा नोटीसा आल्या. त्यामुळे ते भाजपासोबत जाऊन बसले. आज तोच प्रयत्न जयंतराव यांच्यासोबत करण्याची भूमिका घेतलेली दिसते. पण मला खात्री आहे की त्यांची भूमिका स्पष्ट आहे, असं शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-