मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आजारपणावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील सरकार सैरभैर झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा भाजपचा डाव असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची खेळी निष्प्रभ करण्यासाठी अजितदादा यांना मुख्यमंत्रीपद देण्याची खेळी केली जाऊ शकते, असंही सांगितलं जात आहे.
हा सर्व प्रकार भाजपचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहे. काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, अजित पवार भेटीबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असंही विजय वडेट्टीवार म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- आता आधी पैसे भरा मगच मिळणार वीज!, लवकरच बसणार नवे मीटर
- ठाकरे कुटुंबातील व्यक्तीबाबत शिंदे गटातील आमदाराचा खळबळजनक दावा!
- Weight Loss Drink | ‘या’ पेयाने चरबी होईल लगेच दूर
- अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांचं टेंशन वाढवलं!
- ‘…त्याला तुम्ही राज्याचा उपमुख्यमंत्री करता’; शालिनीताई पाटील यांची अजित पवारांवर टीका