पुणे | भाजपसोबत हातमिळवणी करत अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर राष्ट्रवादीत नेमकी फूट का पडली यावर राष्ट्रवादीतील नेत्यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील मौन बाळगलं होतं. अखेर यावर शरद पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. तसेच जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबतही तोच प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे.
इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट रोजी बैठक होत आहे. हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बैठक सुरू होईल. दुपारपर्यंत ही बैठक चालणार आहे. ही बैठक आयोजित करण्याची जबाबदारी मी स्वत:, उद्धव ठकारे आणि नाना पटोले यांनी घेतली, असं पवारांनी सांगितलंय.
आम्ही उत्तमरित्या बैठक पार पाडू. काँग्रेसने त्यांच्याकडून बैठकीला कोण उपस्थित राहणार याची यादी दिलेली नाही. त्यामुळे सोनिया गांधी येणार की नाही हे माहीत नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या-