अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांचं टेंशन वाढवलं!

मुंबई | राष्ट्रवादीमुळे (Ncp) शिंदे गट आणि भाजपची (Bjp) डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादीने चार पालकमंत्रीपदांवर दावा केला आहे. त्यातील दोन पालकमंत्रीपदांवर आधीच भाजप आणि शिंदे गटाने दावा केलेला आहे. त्यामुळे महायुतीत पालकमंत्रीपदासाठीची रस्सीखेच वाढली आहे.

पुण्याच्या (Pune) पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही आहे. तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे. असं असतानाच आता अजित पवार गटाकडून पुणे, नाशिक, रायगड आणि कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाला 10 पालकमंत्री पद मिळणार असल्याची माहिती आहे. त्यात पुण्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांचं जास्त लक्ष पुण्याकडे असतं. विरोधात असताना ते पुण्यात सतत बैठका घेत होते. मात्र स्थानिक भाजप कार्यकर्ते अजित पवार यांना पालकमंत्री करण्यास विरोध करत आहेत. कारण पालकमंत्री राष्ट्रवादीचा झाल्यास पुण्यात भाजप बॅकफूटवर जाईल. आता भाजप पुण्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला सोडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-