मुंबई | सरकारमध्ये कार्यरत असलेल्या सिंगल पॅरेंट (Single Parent) पुरुष कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सिंगल पॅरेंट कर्मचाऱ्यांना चाइल्ड केअर लीव्ह मिळणार आहे. आपल्या सेवेच्या पूर्ण कार्यकाळात कर्मचारी एकूण 730 दिवसांची ‘सीसीएल’ घेऊ शकतो. (men will get 730 days leave)
आतापर्यंत या सुट्टीची तरतूद फक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी होती. महिला कर्मचाऱ्यांना दोन मुलांसाठी प्रति वर्ष तीन टप्प्यांमध्ये ही सुट्टी दिली जात होती. आता एकल पुरूषांना देखील सुट्टी मिळणार आहे.
महिला तसेच एकल पुरुष सरकारी कर्मचारी 730 दिवस एवढी बालकाच्या देखभालीसाठी सुटी घेऊ शकतात. ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.
सातव्या वेतन आयोगात पुरुष सिंगल पॅरेंटबाबत शिफारस करण्यात आली होती. त्याआधारे हे नवीन नियम तयार करण्यात आले आहे. सातव्या वेतन आयोगात सिंगल पॅरेंट कर्मचाऱ्यांबाबत नोंद घेण्यात आली होती. पुरुष सिंगल पॅरेंटमध्ये अविवाहित, विधुर, घटस्फोटीत पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. त्याबद्दल आधीच अटकळी होत्या. त्या आता स्पष्ट झाल्या आहेत, असं सिंह यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
- एक ग्लास दारु… आताच द्या लक्ष नाहीतर या गंभीर आजाराचा धोका!
- मोदींच्या राज्यात आता घरचं जेवण देखील 34 टक्क्यांनी झालं महाग, कसं ते तुम्हीच सविस्तर पाहा
- पोरीनं आखला बापाचा पाय तोडायचा प्लॅन, माढ्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला!
- राजस्थानमध्ये 19 नवे जिल्हे, महाराष्ट्रातही 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव?
- मुलगा बोलला की वाजायची शिट्टी.. डॉक्टरांकडे नेताच झाला अजब खुलासा