‘…त्याला तुम्ही राज्याचा उपमुख्यमंत्री करता’; शालिनीताई पाटील यांची अजित पवारांवर टीका

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्र डागलं आहे. शालिनी ताई पाटील यांनी अमित शहांकडे शिखर बँकेतील दरोडेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केलीये.

तुम्ही माझ्या संस्थेची सुमारे 25 हजार सभासदांची मालमत्ता दिवसा ढवळ्या दरोडे घालून ज्या व्यक्तीने लुटून नेली. तो शिखर बँकेतील 25 हजार कोटींचा दरोडेखोर ज्याला सुप्रीम कोर्टाने आरोपी ठरवलं आणि त्याच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आम्ही FIR दाखल केला, याला आता 4 वर्षे पूर्ण झाली. मात्र त्याचावर आता कोणतीही कारवाई न करता त्या आरोपीला पक्षात घेता इतकंच नाहीतर त्याला राज्याचा उपमुख्यमंत्री करता हा महाराष्ट्राच्या खुर्चीसह अपमान असून जनतेचीही निराशा केल्यासारखं आहे, असं म्हणत शालिनी ताई पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.

तुम्ही आरोपीला उपमुख्यमंत्री करत तुम्ही आमच्या दु:खावर फुंकर घालत आहात की मीठ चोळत आहात?, असा सवाल शालिनीताई पाटील यांनी भाजपला केला आहे.

दरम्यान, याआधीही शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. शरद पवारांशिवाय अजित पवारांना कोणी विचारात नाही. अजित पवारांनी भाजपत सामील व्हावं किंवा स्वत:चा पक्ष स्थापन करावा. अन्यथा शरण जावं, असं वक्तव्य शालिनीताई पाटील यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-