मोदींच्या राज्यात आता घरचं जेवण देखील 34 टक्क्यांनी झालं महाग, कसं ते तुम्हीच सविस्तर पाहा

मुंबई | सध्या महागाईनं सगळ्यांचं जगणं मुश्किल केलंय. पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rate) दर तसेच इतर वस्तूंच्या दरांमध्ये कोणतीही घट झाल्याची नोंद नाही. अशातच महागाईचा (Inflation) राक्षस गेल्या दहा वर्षात कमालीचा क्रूर झालाय. (home food has become more expensive)

अतिवृष्टीमुळे शेतीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या आयुष्यावर दिसू लागला आहे. टॉमॅटो आणि भाज्यांच्या किंमती वाढल्यामुळे जनसामान्यांची जेवणाची थाळी जुलैमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात महागली आहे.

क्रिसिलने देशभरातील भागांमध्ये खाद्यपदार्थाच्या किमतीच्या आधारे प्रति व्यक्तीमागे जेवण तयार करण्यासाठी किती खर्च लागतो हे काढलं.क्रिसिलने जारी केलेल्या एका अहवालानुसार जुलैमध्ये शाकाहारी थाळी 34 टक्के तर मांसाहारी थाळी 13 टक्के महाग झाली आहे. व्हेज थाळी महागण्यामागे टॉमॅटोचा 25 टक्के वाटा आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये एका व्यक्तीच्या जेवणाचा खर्च 24. 40 रूपये येत होता. मागील 16 महिन्यांत थाळीवरील खर्च जुलैमध्ये सर्वाधिक झाल्याचं दिसतंय.

महागाई कमी होणार का?

येत्या काळात महागाई कमी होण्याची शक्यता नाही, असं जाणकर सांगतात. जुलै महिन्यात दर 4.81 टक्क्यांवरून 6 ते 6.8 टक्के होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-