बायको नवऱ्याला उठता बसता म्हणायची काळा!, नंतर त्याच्यावरच ठोकली केस… कोर्टाचा मोठा निकाल

Trending News | प्रत्येक घरात भांडणं होतातच. त्यात पती पत्नीचं भांडण (Husband Wife Clashes) ही एक सामान्य गोष्ट आहे. घराघरात नवरा बायकोची छोटी मोठी भांडणं ही होतच असतात. परंतु काहीवेळा हीच भांडणं घटस्फोटाच्या (Divorce) मुद्यापर्यंत येऊन पोहोचतात. सध्या अशाच एका पती पत्नीच्या घटस्फोटाची आणि घटस्फोटामागील कारणाची चर्चा सर्वत्र चालू आहे.

पत्नी आपल्याला काळा म्हणून हिणवते म्हणून पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. (Wife Insults Husband Over black skin) मात्र 2017 मध्ये कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटासाठी पतीची याचिका फेटाळून लावली. यानंतर पतीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच या महिलेने उलट पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता उच्च न्यायालयाने यावर निकाल दिला.

पतीने एका महिलेशी अवैध संबंध ठेवल्याचे पत्नीचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. पत्नी पतीच्या काळ्या रंगावरुन त्याचा सतत अपमान करत होती आणि त्यामुळंच दुसरं काहीही कारण नसताना ती त्याच्यापासून वेगळं राहत होती. त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात येत आहे, असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केलेल्या जोडप्याचे 2007 साली लग्न झालं होतं. त्या दोघांना एक मुलगीदेखील आहे. पतीने 2012 मध्ये घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. मात्र 2017 साली कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पतीने पुन्हा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. हायकोर्टाने सर्व पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांचा घटस्फोट मंजुर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-