शरद पवारांना पाठिंबा वाढतोय, पाहा फोटोत काय दिसतंय!

सातारा | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठं बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली, अजित पवार यांना भाजपने उपमुख्यमंत्री सुद्धा केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची यासाठी अजित पवार यांचा थेट शरद पवार यांच्याशी संघर्ष सुरु झाला आहे.

अजित पवार यांनी पक्षावर आपली पकड मजबूत करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे, दुसरीकडून तशीच सुरुवात शरद पवार यांच्याकडून देखील केली जात आहे. आता शिवसेनेप्रमाणे हा वाद सुद्धा कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

सर्व घडामोडी घडत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा जनता कुणासोबत आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. शरद पवार यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे, त्यामुळे त्यांनी जनतेचा पाठिंबा लक्षात घेता लगेचच जनतेत जाण्याचा निर्णय घेतला आणि प्रीतिसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं दर्शन घेऊन राज्यभरातील आपल्या दौऱ्यांची घोषणा केली.

शरद पवार यांच्या या कृतीला लोकांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसताना आहे. शरद पवार यांच्या पहिल्याच दौऱ्याला लोकांची तुफान गर्दी पहायला मिळाली. सोबतचे फोटो याची साक्ष देत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात शरद पवार यांना मिळणारा पाठिंबा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाहा खालील फोटोत दिसणारी गर्दी-

sharad pawar 1