मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदींकडे मोठी मागणी केली आहे.
आपल्या देशाची जगात बदनामी होत आहे. आपल्या देशात चुकीच्या गोष्टी होत आहेत. मोदीजी या चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना रोखा. महाराष्ट्राच्या सरकारला राजीनामा द्यायला सांगा. आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.
मोदीजी तुमच्या कारभाराचे धिंडवडे 33 देशात नव्हे, जगातही निघतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही 25 ते 30 वर्ष युतीत होतो. आम्हाला वाण नाही पण थोडा काळ गुण लागला असं त्यांना थोडा काळ वाटलं असेल. महबूबा मुफ्ती यांच्यासोबत सत्तेचा पाट मांडला. ती नैतिकता वाटते काय? असा सवाल त्यांनी केला.
हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी बाळासाहेबांनी आपल्या शिरावर घेतली होती. पण शिवसेना आपली बटीक करण्याचा डाव कोर्टाने उधळला आहे. त्यामुळे ही बदनामी थांबवावी. तातडीने या सरकारला पायउतार घेण्यास भाग पाडावं. लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी मोदींना केलं.
महत्वाच्या बातम्या-
- “…तर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार आणलं असतं”
- “सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल”
- उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका; शिंदे सरकार बचावलं
- महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
- “संजय राऊतांचा स्वत:चाच उकिरडा झालाय”