उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका; शिंदे सरकार बचावलं
मुंबई | राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या (Eknath shinde) बाजूने लागला आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना दिलासा आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा (Resignation) दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.
नबाम रेबिया प्रकरणाचा फेरविचार केला पाहिजे. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या मोठ्या घटनापीठाकडे पाठवणार आहे. 27 जूनचा निकाल नबाम रेबियानुसार नव्हता त्यामुळे नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग अध्यक्षांच्या अधिकाराच प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनपीठाकडे देण्यात आले आहे.
दरम्यान, सुनावणी दरम्यान राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते त्यानंतर पुन्हा निकालवाचनात राज्यपालांच्या निर्णयावर बोट ठेवले आहे. अविश्वास प्रस्ताव आलेला नसताना राज्यपालांनी बहुमता चाचणीसाठी बोलावणं गैर आहे, असं न्यायालयाने म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.