“सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल”

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा हा निकाल असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

देशात लोकशाहीची हत्या होते की काय असं चित्र आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचे विरोधी एकत्र आले आहेत. आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. मी त्यांचं स्वागत करतो, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं.

राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त होती. त्याचे धिंडवडे शासनकर्ते काढत आहेत. त्यामुळे राज्यपाल यंत्रणा ठेवावी की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालयापुढे नेला पाहिजे. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नव्हता, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं.

अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे ठेवला असला तरी पक्षादेश देण्याचा निर्णय शिवसेनेचाचा राहणार आहे. कोर्टाने विधानसभेचा मान राखला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या व्हीपनुसारच निर्णय द्यावा लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-