‘तुमचं जितकं वय तितका…’; राष्ट्रवादीच्या नेत्याने संजय राऊतांना झापलं

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) धुसफूस सुरु आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काहींना काही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे वातावरण तापलेलं दिसून येत आहे.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून पहाटेचा शपथविधी आणि उद्धव ठाकरे (Udhhav Thakceray) यांच्या बाबाबत मांडणी करण्यात आली आहे. यावरून आजच्या सामनातून राष्ट्रवादी पक्षावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. याला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार यांनी (Sharad Pawar) ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हणाले होते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? संजय राऊत यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावे? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

राऊत तुमचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवार यांचं राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते कुणाच्या घरात गेले होते, त्यांना माहिती. मात्र संजय राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गटावर आणि त्यांच्या बॅगांवर ठेवलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-