पुणे | हवामान विभागाने (Weather Department) पुणे आणि परिसरासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. दिवसा ऊन तर दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण अशी अनुभूती पुणेकरांना झाली.
हवामानाची स्थिती पाहता उत्तर कर्नाटक व परिसरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात तुरळक भागात पावसाची शक्यता कायम आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
पुणे परिसरात गुरुवारी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली होती. शहर आणि परिसरात रविवारपर्यंत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- “कुणी जात असेल तर थांबवण्याचा प्रश्न उद्भवत नाही”
- मोठी बातमी! सापळा रचून पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
- ‘खुटा हलवून जाम करण्याचा प्रकार’; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका
- ‘शरद पवारांचा हा पावर गेम होता’; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
- पवारांचा राजीनामा नामंजूर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!