पवारांचा राजीनामा नामंजूर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 2 मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा सर्वांनाच अनपेक्षित होती. तेव्हापासून राज्यभरात या निर्णयाचे पडसाद उमटत होते.

आज राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक सुरू होताच प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एक ठराव मांडण्यात आला. दुसरा ठराव शरद पवार हेच तहह्यात राष्ट्रीय अध्यक्ष ठेवण्याचा ठराव मांडण्यात आला.

शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असं पटेल यांनी जाहीर केलं. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.

निवड समितीच्या या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. NCPच्या कार्यालयाबाहेर आनंदाचं वातावरण पहायला मिळत असून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-