“40 आमदार घेऊन वजीर गायब होणार, म्हणून पवारांनी राजीनामा दिला”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजीर 40 आमदारांसह गायब होणार होता. त्यामुळे शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, असं महेश शिंदे यांनी म्हटलंय.

शरद पवार हुशार आहेत. त्यांना कळलं होतं की, वजीर निघून चालला आहे. त्यामुळे आख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. थोड्या दिवसांनी हे होणारच आहे. त्यामुळे हा प्रश्न नाही. पण, शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, असं ते म्हणालेत.

महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ होतीच कुठं? ‘वज्रमूठ’ करण्यासाठी अंगात ताकद लागते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी वज्र आणि मूठ दोन्ही गायब केलं आहे. फक्त केविलवाणा प्रयत्न चालू आहे, असं म्हणत त्यांनी आघाडीवर टीका केलीये.

महाराष्ट्रात प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. एका घरात दोन मुख्यमंत्री कसं होणार हा मोठा प्रश्न आहे. ज्याची क्षमता आहे, त्याने मुख्यमंत्री होण्यास हरकत नाही, असंही त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-