अजित पवारांबाबत शालिनीताई पाटलांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ!
मुंबई | शरद पवार माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही आपला कामकाज संभाळते त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, असं माजी आमदार शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी म्हटलंय.
अजित पवार (Ajit Pawar) घोटाळेबाज आणि गुन्ह्यांखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल, अशी घणाघाती टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
जर पुढचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष ठरवायचा असेल तर सुप्रिया सुळे यांनाच बनवावं. कारण ती याच्यासाठी सक्षम आहे. अजित पवार हे घोटाळेबाज आणि गुन्ह्याखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं हे चुकीचं ठरेल,, असं शालिनी पाटील यांनी म्हटलंय.
अजितदादांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे, म्हणूनच ईडीकडून अद्याप एकदाही अजितदादांची चौकशी झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- “पक्ष फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा विचार पवारांच्या मनात आला असेल”
- शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!
- “मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडलं नाही”
- दिल्लीत मोदींसोबत झालेल्या ‘त्या’ भेटी मागचं कारण अखेर शरद पवारांनी सांगितलं
- शरद पवारांचा आत्मकथेतून अत्यंत खळबळजनक खुलासा!
Comments are closed.