दिल्लीत मोदींसोबत झालेल्या ‘त्या’ भेटी मागचं कारण अखेर शरद पवारांनी सांगितलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बनण्याआधीचा किस्सा स्पष्ट केला आहे. 2019मध्ये भाजपला (Bjp) शिवसेनेला वगळून सरकार स्थापन करायचं होतं आणि त्यासाठी राष्ट्रवादीला निरोप होता, असा सर्वात मोठा खुलासा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुस्तकातून केला आहे.

शिवसेना आणि भाजप युतीतून लढल्यानंतर सरकार बनवताना शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार बनवता येईल का यासाठी भाजप प्रयत्न करत होता,असा खळबळजनक गौप्यस्फोट या पुस्तकातून करण्यात आला आहे.

आम्हालाही अनौपचारिकरित्या सोबत घेऊन सत्ता बनवता येईल असा निरोप होता. मी प्रत्यक्ष त्या चर्चेत सहभागी नव्हतो. मात्र दोन्हीकडच्या प्रतिनिधींमध्ये याबाबत चर्चा झाली होती. मला या गोष्टी कळताच भाजपसोबत जाणे सोयीचे होणार नाही म्हणून मीच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना स्पष्ट नकार कळवला होता, असं पवारांनी स्पष्ट केलंय.

दिल्लीत जाऊन मी मोदींना स्वतः भेटलो होतो आणि आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही अस मोदींना कळवलं होत, असं शरद पवार यांनी पुस्तकात म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-