सोलापूरचा सुपुत्र करणार देशातील द्राक्ष उत्पादकांचे नेतृत्व

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | भारतीय द्राक्ष विकास परिषदेच्या अध्यक्षपदी श्री. शिवाजीराव लक्ष्मण पवार यांची निवड झाली. श्री. शिवाजीराव पवार हे होणसळ (जि. सोलापूर) येथील प्रगतशील द्राक्ष शेतकरी असून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सन २०१३ साली भारतीय द्राक्ष विकास परिषदेची स्थापना झाली असून तिची पहिली कार्यकारी सभा काल दि. २८ एप्रिल रोजी पुण्यात संपन्न झाली.

सदर सभेत श्री. शिवाजीराव पवार यांची एकमुखाने परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. भारत हा जगातील प्रमुख द्राक्ष उत्पादक देत असून महाराष्ट्रात प्रामुख्याने प्रगत द्राक्ष बागायत केली जाते.

भारतीय पेठेसोबतच आंतरराष्ट्रीय द्राक्ष बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय द्राक्षांच्या गुणात्मक वाढीसाठी आणि द्राक्ष शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारतीय द्राक्ष विकास परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.

सोलापूरचा सुपुत्र करणार देशातील द्राक्ष उत्पादकांचे नेतृत्व सोलापूरचे सुपुत्र श्री शिवाजीराव पवार यांची द्राक्ष विकास परिषदेच्या ( Grapes Council of India ) च्या एकमताने अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यानिमित्ताने देशातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे नेतृत्व सोलापूरचा सुपुत्र करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-