मुंबई | जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय?, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) केला आहे.
केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलं.
काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही, असं ते म्हणालेत.
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
- ‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीये’; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- ‘माझ्या धर्माला ज्यावेळी नख लावाल त्यावेळी मी हिंदू म्हणून…’; राज ठाकरेंचा इशारा
- एका दिवसाचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल?, राज ठाकरे म्हणाले…
- ‘मुघल सम्राट अकबर हिंदू होते’; भालचंद्र नेमाडेंचं मोठं वक्तव्य
- “असा वेडेपणा करू नका असं अनेकदा सांगितलं”