‘मुघल सम्राट अकबर हिंदू होते’; भालचंद्र नेमाडेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | मुघल सम्राट अकबर हिंदू होते, असं मोठं वक्तव्य ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी केलं आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आपल्याकडे हिंदू असणं म्हणजे सिंधू नदीच्या अलिकडचे सर्व लोक म्हणजे हिंदू होते. अकबर, शहाजहाँच्या काळात इराणी लोक हिंदू अकबरला धडा शिकवला पाहिजे असं म्हणायचे. कारण अकबरसह सगळे हिंदूच होते. ताजमहाल बांधणाऱ्याची आई हिंदू होती. हे आपण मान्य केलं पाहिजे की, आपण सगळे एकच आहोत, असं ते म्हणालेत.

दुर्दैवाने मधल्या काळात हा वेगळा, तो वेगळा असं झालं. एकमेकात द्वेष पसरवण्यात आला. त्यामुळेच आपल्या देशाची फाळणी झाली. त्यातून नुकसान झालं, असं त्यांनी म्हटलंय.

भारतात खरंच लोकशाही धोक्यात आहे. तुम्ही खरं बोलल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षणात राहावं लागतं. सरकारी धोरणापेक्षा उलटं बोललं तर तुमची चौकशी होते, असं मत भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी व्यक्त केलंय.

महत्वाच्या बातम्या-