मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना फोन

मुंबई | रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू (Barsu) येथील रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची फोनवरून बारसू ग्रीन रिफायनरी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का, याची तपशील गुलदस्त्यातच आहे.

 उदय सामंत यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यासोबत रिफायनरीवरून सुरू असलेल्या वादावरही चर्चा झाल्याचं सांगितलं.

बारसूबाबत काही घाई करू नका असा सल्ला शरद पवार यांनी उदय सामंत यांना दिला. तसंच उद्या आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करू असं आश्वासनही पवारांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या-