महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या तीनही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत शिवसेनेकडून गौप्यस्फोट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कोणालाही मुख्यमंत्री बनवा, आम्ही पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव ठाकरेंनी शरद पवारांना दिला, असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

ज्या मुख्यमंत्रीपदाकरता उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून मुख्यमंत्री पद घेतले, ते मुख्यमंत्री पदही गेले. तेल ही गेले तुप ही गेले, हाती आले धोपाटणे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-