पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुणे (Pune) महापालिकेची विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि टाक्यांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी (27 एप्रिल) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) 27 एप्रिलला पर्वती, छावणी, नवीन आणि जुने होळकर, भामा-आसखेड, वारजे, SNDT, चतुशृंगी, वडगाव आणि कोंढवे-धावडे यासह अनेक जलशुद्धीकरण केंद्रांवर दुरुस्तीचं काम करणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे. येत्या 28 एप्रिलपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल.

‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व पेठ परिसर, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर 1 आणि 2, लेक टाऊन एरिया, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गाव, डायस प्लॉट, ढोले माला एरिया, सॅलिसबरी भवन, गव्हाण पार्क, गव्हाणनगर परिसर , मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पार्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गणेजेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, पुणे केनवडी परिसर, कॅनव्हाणगाव परिसर, साडेसातरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी , खराडी , वडगाव शेरी , ताडीवाला रोड , मंगळवार पेठ , मालधक्का , येरवडा , रेसकोर्स, मुळा रोड, खडकी, हरिगंगा सोसायटी, लोहेगाव, विमाननगर, कल्याणनगर, कल्याणनगर, फुगेवाडी, कळस, धानोरी, पाषाण, भुगाव रोड, बावधन, उजवीकडे व डावीकडे भुसारी कॉलनी, गुरुगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लाडकी, लांडगे. सुस रोड, रेणुकानगर, पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, धनंजय सोसायटी, कोथरुड प्रादेशिक कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, कर्वेनगर, ता., रामनगर, कॅनॉल रोड, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रोड, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध या परिसरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-