’28 हजरांचा स्वेटर बघून बायको म्हणाली…’; झिरवळांनी सांगितला जपानमधला किस्सा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | जपान (Japan) दौऱ्याहून परतलेले आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी जपान दौऱ्यातील एक किस्सा सांगितला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

मी माझ्या पत्नीसोबत स्वेटर खरेदी करायला एका दुकानात गेलो. तिथे आम्हाला एका स्वेटरची किंमत 28 हजार रुपये सांगितली. हे ऐकून माझी बायको म्हणाली, एवढ्या पैशात तर घरातील सर्वांना स्वेटर घेऊनही पैसे उरतील, असं ते म्हणालेत.

आपल्या नाशिकला तर 1200 रुपयात स्वेटर मिळतो, असे ती म्हणाली आणि आम्ही दुकानातून काहीच न घेता बाहेर पडलो, असं नरहरी झिरवळांनी सांगितलं.

दरम्यान, किंमती न विचारता थेट खरेदी करायची असं ठरवून पत्नीला वस्तू खरेदीसाठी आग्रह धरला. मात्र ती काही केल्या तयार होईना. शेवटी नातवंडासाठी काही खेळणी घेतली आणि भारतात परतल्याचे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-