“सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार हे भाजपमध्ये जातील, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. याबाबत त्यांनी याचा विचारही केला असावा. अजित दादांचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा ते अजित पवार हे भाजपसोबत गेले नव्हते ते राष्ट्रवादीतच होते, असा एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले

आपण उपमुख्यमंत्री होऊन वर्ष-वर्ष आपण कष्ट करतोय. त्यामुळे त्यांनी आपण मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलंय. यात गैर काय?, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. 

सध्या राजकारणात काही घडू शकतं. त्यामुळे पुढच्या कालखंडात या राज्याचे अजित पवार हे मुख्यमंत्री झाले असतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय.

मी भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भोसरी जमिनीचं प्रकरण माझ्यामागे लावण्यात आलं. वास्तविक या जमिनीच्या प्रकरणात कुठलंही तथ्य नाही. या प्रकरणाशी माझाही काहीही संबंध नाही, असा अहवाल एसीपीने कोर्टात सादर केला होता. मी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यामुळे जुना अहवाल बाहेर काढण्यात आला. त्या माध्यमातून माझ्यामागे ईडी लावण्यात आली, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-