मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेपर्वाईमुळेच पुलवामामध्ये जवानांचा बळी गेल्याचा दावाही केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला घेरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मौनी बाबा का झाला? त्यांच्या जिभेला मौनाचा आजार का जडला? असा सवाल संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून केला आहे.
पुलवामा हल्ला हा सरकार प्रायोजित होता काय? 2019 च्या निवडणुका जिंकता याव्यात यासाठी सुनियोजित पद्धतीने रचलेले हे राजकीय षङयंत्र होते काय? अशा शंका आता उघड झाल्या आहेत. सत्यपाल मलिक यांना तोंड बंद ठेवण्यास सांगितले गेले, पण ‘पुलवामा’ पद्धतीचा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज गुप्तचर खात्याने दिला होता, असं राऊतांनी म्हटलंय.
गुप्तचरांनी सरकारला दिलेली माहिती खरी ठरली. तेच जैश-ए-मोहम्मदबद्दल. त्यांच्याद्वारे त्याच मुदस्सीर खानच्या नेतृत्वाखाली त्याच पुलवामा, अवंतीपोरा भागात आयईडी स्फोट घडवून 40 जवानांची हत्या केली. हे असेच घडेल याची खबर जशीच्या तशी ‘आयबी’ने गृह मंत्रालयास कळवली होती. सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आणि 40 जवान प्राणास मुकले. राष्ट्रद्रोह आणि सदोष मनुष्यवध यालाच म्हणतात, असं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-