‘फूकून उडवून टाकेन’; महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना टाेला

कोल्हापूर | कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर करण्यात आला आहे. संस्था गटातून सत्ताधारी गटाच्या राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) विजयी झालेत.

महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांनी विजयाचं श्रेय सभासदांबराेबरच माजी आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना दिलं आहे. माध्यमांशी बाेलताना महादेवराव महाडिक यांनी आजचा विजय हा आवाडे सावकार, विनय काेरे यांच्यासह सर्व महाडिक गटाचा आहे. या सर्वांचे महादेवराव महाडिक यांनी आभार मानले.

मागच्या 28 वर्षांपासून महाडिक यांच्याकडे असलेल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी सतेज पाटील यांनी यंदा कंडका पाडायचा अशा टॅगलाईवर चंग बांधला होता. यावरून महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटलांना डिवचलं आहे.

ज्याला शड्डू मारायला येत नाही, त्याला शड्डू मारायला शिकवत आहेत. मी शेलार मामा आहे, मी फूकून उडवून टाकेन, असा इशाराही महादेव महाडिक यांनी विरोधक सतेज पाटील गटास दिला.

महत्वाच्या बातम्या-