सुट्टी घेऊन एकनाथ शिंदे पोहोचले गावी; व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या साताऱ्यातल्या दरे या गावी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या गावी दोन दिवस मुक्काम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांची शेती दाखवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या शेतात कोणकोणती वेगवेगळी झाडं आहेत, याची माहिती देताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून बाहेर निघाल्यानंतर संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे सुट्टीवर गेले आहेत, असं ऐकलं. ते कुठे आहेत?, असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला होता.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री रजेवर असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्र्यांकडे थोडी तरी माणुसकी असेल तर त्यांनी एकदा बारसूमध्ये जाऊन शेतकऱ्यांबरोबर संवाद साधावा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-