‘पोपट येतात आणि उडून जातात’; राऊतांची राज ठाकरेंवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन आज राज ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde( यांच्यावर जोरदार टीका केली. कोकणात सभा घेऊ द्या. असे पोपट येतात आणि उडून जातात. पोपट पोपट असतो, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे. 

बारसू रिफायनरी प्रकल्प हा काय कोकणातील पहिला प्रकल्प आहे काय? रायगडमध्ये अनेक प्रकल्प आहेत. अनेक उद्योगपतींचे आहेत. कुणी विरोध केले का? चिपळूणलाही आहे. कोणी विरोध केला? केलाय का विरोध? विरोध झाला तो फक्त स्टरलाईटला. नव्वदच्या दशकात विरोध झाला, असं राऊतांनी सांगितलं.

मी सुट्टीवर गेलो नाही. डबल ड्युटीवर आहे. त्या भागातून धूर येत आहे सारखा. दरेगावातून धूर येत आहे. एका वृत्तपत्रात वाचलं. मला माहीत नाही. काय जळतंय आतमध्ये. कारण पेपरमध्ये बातम्या आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका प्रश्नाला उत्तर देताना टीका केली. शाह गृहमंत्री कमी आणि भाजपचे नेते जास्त आहेत. या देशाला उत्तम गृहमंत्र्याची गरज आहे. महाराष्ट्रालाही सक्षम गृहमंत्र्याची गरज आहे. निष्पक्षपाती गृहमंत्र्यांची गरज आहे. नुसते पाठी सरदार पटेल यांचे फोटो लावून चालत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

महत्वाच्या बातम्या-