मुंबई | भारतात खरंच लोकशाही धोक्यात आहे. तुम्ही खरं बोलल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षणात राहावं लागतं. सरकारी धोरणापेक्षा उलटं बोललं तर तुमची चौकशी होते, असं मत ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी व्यक्त केलंय.
सरकारी धोरणाप्रमाणे वागला तर तुम्ही नीट राहता आणि तुम्ही त्या सरकारी धोरणापेक्षा उलटं बोलला की तुमची चौकशी होते. हे काही लोकशाहीचं लक्षण नाही. खरंतर स्वतःच्या पक्षातील लोकांच्या चौकशा केल्या पाहिजेत. ती लोकशाही असते. दुर्दैवाने तसं होत नाही, असं नेमाडे म्हणालेत.
मलाही एक पत्र आलं होतं. त्यामुळे मला फार वाईट दिवस काढावे लागले. मला आता लक्षात आलं आहे की, बोलण्याचा उपयोग नसेल, तर बोलू नये. नाही तर आपली महत्त्वाची कामं राहून जातात, असं ते म्हणालेत.
मी रोज वर्तमानपत्र वाचत नाही. मी काही काळ वाचत होतो, पण नंतर लक्षात आलं की, त्यात खरं येत नाही, असंही नेमाडे म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-