‘माझ्या धर्माला ज्यावेळी नख लावाल त्यावेळी मी हिंदू म्हणून…’; राज ठाकरेंचा इशारा

मुंबई | लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची अनोखी मुलाखत आयोजित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ही मुलाखत घेतली.

राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत मुंबई पोलिसांबरोबरच त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा त्यांनी आपल्या शब्दात गौरव केला.

ज्या वेळी मराठीला नख लावाल त्यावेळी मी मराठी म्हणून मी अंगावर येईन आणि माझ्या धर्माला ज्यावेळी नख लावाल त्यावेळी मी हिंदू म्हणून मी तुमच्या अंगावर येईन, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांच्यापासून ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत एका वाक्यात त्यांनी सल्ला दिला आहे. त्यामुळेही जोरदार हशा पिकला होता.

महत्वाच्या बातम्या