“पंतप्रधान मोदी पुंगी वाजवतात अन् अंधभक्त डोलतात, जे डोलत नाही त्यांना”

मुंबई | भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना शंकराचा अवतार मानतात. मग सापाचा एवढा तिटकारा का? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुंगी वाजवतात आणि अंधभक्त त्यावर डोलतात, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने केली आहे. दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

भाजपच्या (Bjp) जहरावर कुणी टीका केली असेल तर भाजपने त्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात आम्हीही 30 वर्ष सापाला दूध पाजले. ते पिल्लू तेव्हा वळवळ करत होते. आता आमच्यावर फुत्कारत आहे, अशी जहरी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे. 

जेव्हा आपला जीव धोक्यात असतो तेव्हाच साप चावतो. पण दुष्य माणूस पावलोपावली तुमचे नुकसान करत असोत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहिलेच पाहिजे. अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, असंच खरगे यांना म्हणायचे आहे, असा दावा अग्रलेखातून करणअयात आला आहे.

साप उगाच कुणाच्या वाटेला जात नाही. त्याच्या शेपटीवर पाय पडल्याशिवाय तो फणा काढत नाही. पण सापांपेक्षाही माणसांच्या जिव्हांतले विष भयंकर आहे आणि न उतरणारे आहे, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-