“मी शरद पवारांना सल्ला कसा देणार?, त्यांना माझा सल्ला पचनी पडेल काय?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शरद पवारांनी (Sharad Pawar) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिलीये.

राष्ट्रवादीत उद्या फायनल निर्णय होणार आहे. तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे. त्यांचा निर्णय होऊ द्या. मग बोलेन, असं सांगतानाच मी शरद पवार यांना सल्ला कसा देणार? आणि माझा सल्ला पचनी पडेल काय? असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. परंतु शरद पवार यांचा निर्णय अजून झालेला नाही. तो आल्यावर मी बोलेन, असं ते म्हणालेत.

महाविकास आघाडीला तडा जाईल असं काही राष्ट्रवादीत घडेल असं वाटत नाही. तसेच या विषयावर मी अधिक बोलणार नाही. महाविकास आघाडीला तडा जाईन असं मी काही करणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-