‘शिंदे सरकार कोसळेल’; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

रत्नागिरी | बारसू प्रकल्पाला एवढा विरोध असूनही शिंदे सरकार मागे हटायला तयार नाहीये. उलट एक पाऊल पुढेच टाकत आहे. माझ्या कालावधीत केंद्राने चांगले प्रकल्प गुजरातला दिले. तेव्हा हे शेपूट घालून बसले होते?, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केलीये.

जनतेच्या घरावर उपऱ्यांची सुपारी घेऊन वरवंटा फिरवताना लाज वाटली पाहिजे. बळ न वापरता जा लोकांसमोर, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं. ते रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

 सुपारी घेऊन फिरणाऱ्यांनी मला सांगितलं बारसूत ग्रामस्थांचा विरोध नाही. ओसाड जमीन आहे. तसेच पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल. त्यानंतर मी केंद्राला पत्र पाठवलं. रिफायनरी होऊ शकेल की नाही याची विचारणा केली होती, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जायला पाहिजे. मी पत्र दिलं होतं. तर मी लोकांमध्ये आलो. तुम्ही का येत नाही? उपऱ्यांची सुपारी घेऊन दलाली का करत आहात?, असा सवाल त्यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-