‘खुटा हलवून जाम करण्याचा प्रकार’; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षातील घडामोडींवर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी तर ट्विटरवर बैलाचा फोटो ट्विट करत खोचक शब्दांत टीका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी ग्रामीण भागातील म्हण वापरत राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आहे. आज शरद पवार साहेबांनी राजीनामा मागे घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते सोंगाड्या खेळ खेळले. याला गाव गाड्यात लोक म्हणतात हलवून खुटा जाम करण्याचा प्रकार, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर केली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. शरद पवार(sharad pawar) हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी तीन ओळीचं निवेदन सादर केलं. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असं पटेल यांनी जाहीर केलं.

महत्वाच्या बातम्या-