“संजय राऊत यांना जाळीच्या गाडीत टाकून त्वरीत बंदोबस्त करावा”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकमेकांवर टीका करण्याची कुठलीही संधी नेते सोडत नसल्याचं दिसतंय. अशा वातावरणामुळे वादाला चांगलंच तोंड फुटलं असून नेते एकमेकांची मापं काढताना दिसत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं एक ट्विट यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल चित्रा वाघ यांनी अत्यंत विखारी शब्दात हे ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे भविष्यात वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाहुयात चित्रा वाघ यांनी या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता ठाकरे गटाच्या सर्वज्ञानी संजय राऊत यांच्या समोर तुकडे टाकायचे बंद केल्यामुळे त्यांची चांगलीच उपासमार होतेय. अडीच वर्षं ज्या मालकांनी बिस्कीट खाऊ घातलं, ज्यांच्या इशाऱ्यावर राऊत शेपूट हलवत होते, त्यांनीच यांच्या गळ्यातली साखळी सोडलीय. म्हणून त्यांची अवस्था पिसाळल्यासारखी झालीय. सकाळी सकाळी भुंकणा-यांनी उच्छाद मांडला आहे… माझी बीएमसी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, यांना जाळीच्या गाडीत टाकून त्वरीत बंदोबस्त करावा…

चित्रा वाघ यांनी आपल्या या ट्विटसोबत एक फोटो सुद्धा जोडला आहे, या फोटोत बीएमसीचे कर्मचारी एका कुत्र्याचा बंदोबस्त करताना दिसत आहेत. चित्रा वाघ यांच्या या ट्विटमध्ये म्हटल्यानूसार त्यांनी एकप्रकारे संजय राऊत यांची तुलना कुत्र्यासोबत केली आहे. या प्रकारामुळे मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.